लेखक - महेश मारवाडी
तपासणी - किशोरी जोशी
ही ओळ डिस्काउंट दाखवण्यासाठी वापरतात.
इथे, "Net 30" म्हणजे , पूर्ण पेमेंट ३० दिवसात झालेच पाहिजे, त्यात काही सूट मिळणार नाही.
पण, "1 % / 10", म्हणजे, जर १० दिवसांच्या आत पैसे दिले तर १% डिस्काउंट मिळेल.
उदाहरण,
रक्कम १००० असेल तर,
१० दिवसांच्या आधी दिली तर तुला १% सूट मिळेल व फक्त ९९० रूपये द्यावे लागतील.
पण १० दिवसांच्या नंतर पूर्ण रक्कम १००० रुपये द्यावे लागतील.